Friday, August 21, 2026
Homeसातारा"फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, तलवारीने मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक"

“फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, तलवारीने मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक”

फलटण :- फलटण तालुक्यातील मौजे बरड येथे तलवारीने गंभीर मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपींना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता, फिर्यादी सुरज लोंढे व त्यांचे साथीदार व्यायामानंतर घरी जात असताना कुणाल मदने, सौरभ लोंढे आणि पांडा मसुगडे यांनी “तुम्हाला लय मस्ती आली का?” असे म्हणत लोखंडी तलवारीने हल्ला केला आणि शिवीगाळ करत गंभीर मारहाण केली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सुनिल महाडिक यांनी आरोपींच्या अटकेसाठी दोन विशेष पथके तयार केली. डीबी पथकाचे पो.उ.नि. गोपाल बदने आणि सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दुधेबावी ता. फलटण हद्दीतील डोंगर भागात लपलेल्या आरोपींना ताब्यात घेतले.

या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments