Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशपती, पत्नी आणि दोन मुलं; तिसऱ्यांदा ती प्रेग्नेंट झाली अन् मग...नवऱ्याचा पायाखालची...

पती, पत्नी आणि दोन मुलं; तिसऱ्यांदा ती प्रेग्नेंट झाली अन् मग…नवऱ्याचा पायाखालची जमीनच सरकली

पती, पत्नी आणि दोन मुलं; तिसऱ्यांदा ती प्रेग्नेंट झाली अन् मग…नवऱ्याचा पायाखालची जमीनच सरकली

[ad_1]

Trending News : नवरा बायको आणि दोन मुलं अगदी नजर लागेल असा सुखी संसार होता. ते चौघ आनंदाने नांदत असताना त्या एका बातमीनंतर नवऱ्याच्या आयुष्यात भूकंप आला. खरं तर आपण या बातमीला गोड बातमी म्हणतो, पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती होती. पण ही बातमी नवऱ्याला समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. नेमका काय आहे हा विचित्र प्रकार जाणून तुम्हाला धक्का बसेल. झालं असं की, तिसऱ्या गूड न्यूजनंतर पत्नीचं विवाह बाह्य संबंध पतीसमोर उघड झाले. 

हा विचित्र प्रकार आहे, उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील आहे. जिल्ह्यातील पणियारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका पतीचे पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याने तो अचंबित झाला. जरी त्याच्या पत्नीने यापूर्वी दोन मुलांना जन्म दिला तेव्हा तो माणूस खूप आनंदी होता, मात्र यावेळी तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. यानंतर पतीने पत्नीला याबाबत सत्य विचारले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

रिपोर्टनुसार, पणियारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात पती-पत्नी खूप प्रेमाने राहत होते. दोघांनाही दोन मुले होती, मात्र तरुणाची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याने त्याला संशय आला आणि त्याला पूर्ण धक्का बसला. यानंतर पतीने पत्नीला याबाबत विचारले असता तिने गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. 

ती दोन मुलंही त्याची…

धक्कादायक म्हणजे पत्नीचे 5 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. ज्यावेळी या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा पत्नीने सांगितलं की, इतके वर्ष तो व्यक्ती ज्या मुलांना आपली मुलं मानत होता. ती तिच्या प्रियकराची होती. ते दोघेही गुपचूप भेटत असत. महिलेने सांगितलं की यादरम्यान ती दोन मुलांची आई झाली पण पतीला याची काही कल्पनाही नव्हती. मात्र, नवरा घरात नसताना महिला तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याने पतीला संशय आला. यानंतर चौकशीत महिलेचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी तिच्यावर कारवाई केली.

प्रियकराशी लग्न…

महिलेचे सत्य जाणून त्या व्यक्तीने तिला आणि तिच्या मुलांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर ती प्रियकराच्या घरी पोहोचली, मात्र प्रियकराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. अशा स्थितीत ही महिला ग्रामपंचायतीकडे गेली, तेथे गावकऱ्यांनी दबाव आणल्यानंतर प्रियकराला हार पत्करावी लागली आणि मंदिरात त्यांचं लग्न लावण्यात आलं. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments