Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशBibek Debroy Passes Away : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार...

Bibek Debroy Passes Away : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचं निधन

[ad_1]

Bibek Debroy Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक परिषदेचे सल्लागार विवेक देबरॉय यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी  शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते अर्थतज्ज्ञ तसेच प्रसिद्ध लेखक होते. देबरॉय यांनी  भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं आहे.  भारतीय आर्थिक धोरणांना आकार देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. देबरॉय यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. डॉ. बिबेक देबरॉय हे अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि इतर विषयांत पारंगत होते. आपल्या कार्यातून त्यांनी भारताच्या बौद्धिक पटलावर अमिट ठसा उमटवला. सार्वजनिक धोरणातील योगदानापलीकडे आपल्या प्राचीन ग्रंथांवर त्यांनी महत्वाचा अभ्यास केला असं मोदी यांनी म्हटलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments