Friday, September 4, 2026
Homeसाताराफलटणमध्ये आमदार दीपक चव्हाणांचे मोठे शक्ती प्रदर्शन; चौथ्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

फलटणमध्ये आमदार दीपक चव्हाणांचे मोठे शक्ती प्रदर्शन; चौथ्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल


फलटण – महाविकास आघाडीचे आमदार दीपक चव्हाण यांनी आज फलटण विधानसभा मतदारसंघातून मोठ्या शक्ती प्रदर्शनासह चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन त्यांनी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, सह्याद्री कदम, विकास नाळे व महाविकास आघाडीचे अन्य नेते-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार दीपक चव्हाण हे यापूर्वी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले असून, यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments