
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण हळूहळू सागर आणि मुक्ता हे जवळ येताना दिसत होते. आशातच मुक्ताचा मित्र आशयची मालिकेत एण्ट्री झाली आहे. त्याच्या येण्याने सर्व काही बदलले आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?