Friday, September 4, 2026
Homeसाताराश्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कोळकी ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचे लोकार्पण संपन्न

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कोळकी ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचे लोकार्पण संपन्न

फलटणः कोळकी शारदीय नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या मंगलदिनी कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने नव्याने खरेदी केलेल्या घंटागाडीचे लोकार्पण जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गावातील कचरा व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक असलेल्या या घंटागाडीचे लोकार्पण सोहळा स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरला.

यावेळी ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पुंडलिक नाळे, सरपंच सौ. अपर्णा पखाले, उपसरपंच डॉ. अशोक नाळे, तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या नव्या घंटागाडीमुळे गावात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments