Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोला पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा! आज पासून सेवा सुरू, असे असणार दर

0
1
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोला पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा! आज पासून सेवा सुरू, असे असणार दर


Pune metro : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे. या उद्घाटनाप्रसंगी मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत.



Source link