Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेनं गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणं कठीण; मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना फटकारलं

0
1
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेनं गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणं कठीण; मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना फटकारलं


Badlapur Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आल्यास योग्य तो आदेश देण्यास भाग पाडले जाईल, असेही स्पष्ट केले.



Source link