[ad_1]
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश मानला जातो आणि ख्रिश्चन धर्माचे ‘टॉप ऑथॉरिटी’ येथेच राहते, असे म्हटले जाते. पोप येथे बसून धर्माशी संबंधित बाबींवर आपले मत मांडतात. व्हॅटिकन सिटीला एका देशाचा दर्जा आहे. त्याच धर्तीवर एका मुस्लीम धर्मगुरूनेही असा देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, जिथून मुस्लिमांचे व्यवहार हाताळले जातील. हा देश अल्बानियाची राजधानी तिराना येथे होणार आहे. हा जगातील सर्वात लहान देश असेल. याचे क्षेत्रफळ न्यूयॉर्क शहराच्या ५ ब्लॉकइतके असेल. येथे दारूला परवानगी देण्यात येणार असून महिलांनाही हवे ते परिधान करण्याची मुभा असणार आहे. त्यांच्यावर जीवनशैलीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
[ad_2]
Source link
