Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशमुलीच्या काळजीने आईने सुरू केला स्वतःचा ब्रँड, सेलिब्रेटीनांही पडली भुरळ, आज कोट्यवधींचा...

मुलीच्या काळजीने आईने सुरू केला स्वतःचा ब्रँड, सेलिब्रेटीनांही पडली भुरळ, आज कोट्यवधींचा टर्नओव्हर

[ad_1]

आपल्यापैकी अनेकजण पुन्हा एकदा ऑर्गनिक किंवा पारंपरिक गोष्टींकडे वळत चालले आहेत. बऱ्यापैकी लोकं आपल्या जीवनात पारंपरिक आणि रुढी परंपरेशी जोडून नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. असं असताना फक्त आहाराच ऑर्गनिक असावा असं नाही तर यासोबतच शरीराशी संबंधित गोष्टी देखील ऑर्गनिक असावा असा विचार केला जातो. अगदी आपला मेकअप देखील.. अशावेळी आठवतं ते ‘बरवा स्किन थेरपी’ (Barva Skin Therapie). 

‘बरवा स्किन थेरपी’ हे एक लोकप्रिय स्क्रिन प्रोडक्टस आहेत. हल्ली महिला निटनेटक्या राहतात. ऑफिसला जाताना थोडा बऱ्यापैकी मेकअप करण्याकडे महिलांचा कल असतो. मुली देखील आईला बघून मेकअप या गोष्टींकडे आकर्षित होत आहे. असं असताना मुलींनी लहान पणापासूनच केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर टाळावा यासाठी ‘बरवा’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

कशी झाली बरवाची सुरुवात? 

बरवाच्या संस्थापक ‘कामाक्षी बर्वे सांगतात की, मुलीने आईकडे बघितल्यावर तिला छान वाटायला पाहिजे. पण माझ्या दोन ते अडीच वर्षांच्या मुलीकडे पाहून मला तसं वाटलं नाही. कारण माझ्या लहान मुलीने माझ्याकडे पाहिलं तेव्हा चक्क तिचे दात जांभळ, गुलाबी झाले होते. कारण तिने माझी संपूर्ण लिपस्टिक दातांना लावली होती. तिचे दात पुसताना मला हा प्रश्न पडला की, मी काय करायला हवं. तेव्हा ‘नॅच्युरल स्किन प्रोडक्ट’चा विचार सुरु झाला. 

आईने मुलीसाठीच सुरु केला ब्रँड 

माझ्यासाठी आणि मुलीसाठी त्वचेसाठी खास काही तरी मला हवं होतं. तूपापासून तयार केलेली लिपस्टिक आणि त्याचं पेटंट भारतातच रजिस्टर असल्याचं मला कळलं, असं कामाक्षी बर्वे सांगतात. अनघा दंडवते यांच्या नावावर हे पेटंट आहे. या पेटंटसाठी कामाक्षी यांनी अनघा दंडवते यांच्याशी संपर्क साधला आणि हे गोष्टीची परवानगी घेतली. महत्त्वाचं म्हणजे अनघा दडंवते यांनी देखील 20 वर्षांपूर्वी आपल्या मुलीसाठी साजूक तूपाची लिपस्टिक तयार केली होती. 

कशी बनवली जाते तूपाची लिपस्टिक 

आपण घरी लोणी कढवून तूप तयार करतो. अगदी त्याच पद्धतीने तूप तयार करुन ही लिपस्टिक तयार केली जाते. या लिपस्टिकमध्ये कोणतंही केमिकल नसून नैसर्गिक अशी तूपाची लिपस्टिक तयार केली आहे. तसेच कोकमाचं तेल वापरलं जातं. बरवाच्या सगळे प्रोडक्ट्स हे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले आहेत. यामध्ये वापरले जाणारे रंग देखील नैसर्गिक असतात. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments