
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी. सध्या त्या चित्रपटांपासून लांब असल्या तरी सामाजिक विषयांवर बिनधास्त पणे त्यांचे मत मांडताना दिसतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण शबाना आझमी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतात. आज १८ सप्टेंबर रोजी शबाना आझमी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…








