
Kolkata rape murder : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार आरजी कर मेडिकल कॉलेजकडून ट्रेनी डॉक्टरच्या पालकांना सांगितले होते की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. ९ ऑगस्टच्या सकाळी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर रुग्णालय असिस्टेंट सुपरिंटेंडेंटने तिच्या पालकाना अर्ध्या तासाच्या काळात तीन कॉल केले होते. पहिला कॉल सकाळी १०.५३ वाजता केला होता.