
जालना : दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष मा.राजाभाऊ देशमुख यांच्या असलेल्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यकर्त्यांनी गर्दी करून विधानसभा लढविण्याचा हट्ट केला, तर सलग दुसऱ्यादिवशी दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी भोकरदन येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व भव्य कार्यकर्ता मेळावा ही घेण्यात आला. घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राजाभाऊ यांनी केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले.आणि संपूर्ण जिल्हाभरात राजाभाऊ देशमुख यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली.
या प्रसंगी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ नेते श्री.बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडवेट्टीवर जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे,माजी मंत्री श्री. सतेज पाटील, श्री.आरिफ नसीम खान, तसेच काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून येत्या विधानसभेची उमेदवारी राजाभाऊ देशमुख यांना मिळावी असा सकारात्मक सुर ऐकू येऊ लागला आहे. तसेच पुढील आठवडा भर विविध सामाजिक कार्यक्रमातून राजाभाऊ यांचा वाढदिवस जनतेच्या सेवेस समर्पित केला जाणार आहे.
वाढदिवसाच्या अनुषंगाने राजाभाऊ देशमुख यांनी केलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे भोकरदन – जाफ्राबाद विधानसभेत काँग्रेस पक्षाची ताकद असल्याची, आणि त्याचे नेतृत्व राजाभाऊ देशमुख यांच्या कडे असल्याची चुणूक दिसून आली. त्यातूनच राजाभाऊ देशमुख यांना उमेदवारी नक्की असल्याचे चित्र दिसून आले.
तसेच मा.राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑगस्ट २०२४ रोजी माहोरा येथे आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीर व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे, ज्याचा लाभ मोहोरा वासियांना मिळणार आहे.
मा. राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या सगळ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. राजाभाऊ देशमुख यांनी केलेले हे शक्तिप्रदर्शन आणि त्यांच्या विधानसभा उमेदवारीच्या चाललेल्या सकारात्मक चर्चा येत्या काळात भोकरदन – जाफ्राबाद मध्ये परिवर्तनाची नांदी केल्या शिवाय राहणार नाही, असे चित्र आहे.







