
KBC 16 Amitabh Bachchan Fees: सगळेच प्रेक्षक अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतीक्षित शो ‘कौन बनेगा करोडपती‘च्या पर्वाची म्हणजेच ‘केबीसी सीझन १६’ची आतुरतेने वाट पाहत होते. आता ती प्रतीक्षा संपली असून, १२ ऑगस्टपासून सोनी लिव्हवर हा शो सुरू झाला आहे. अमिताभ बच्चन या शोचे होस्ट आहेत. नेहमीप्रमाणेच त्यांची हटके आणि डॅशिंग स्टाईल लोकांना नेहमीच वेड लावते. या शोची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण १६ सीझन्समध्ये केवळ एकच सीझन असा होता, जो बिग बींनी होस्ट केला नव्हता. ‘कौन बनेगा करोडपती सीझन ३’ शाहरुख खानने होस्ट केला होता. या शोसाठी अमिताभ बच्चन यांच्या फीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फार बदल झाला आहे. पहिल्या सीझनसाठी अमिताभ बच्चन किती फी घेत होते आणि आता सीझन १६साठी किती फी आकारतात, ते जाणून घेऊया…







