Friday, September 25, 2026
Homeसातारापतंग स्पर्धेचे आयोजन केले असून पतंग स्पर्धेचे उद्घाटन ; श्रीमंत संजीवराजे यांच्या...

पतंग स्पर्धेचे आयोजन केले असून पतंग स्पर्धेचे उद्घाटन ; श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते

फलटण प्रतिनिधी:फलटणकर पतंग प्रेमींसाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री.अनिकेतराजे मित्र मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी पतंग स्पर्धेचे आयोजन केले असून पतंग स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सकाळी ९-०० वाजता दत्त मंदिर शुक्रवार पेठ या ठिकाणी होणार आहे.पतंग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते त्याच दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी संध्याकाळी ५-०० वाजता संपन्न होणार असून यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान आयोजकांच्या वतीने चायनीज (नायलॉन) मांजा वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments