[ad_1]
१५ ऑगस्ट रोजी तीन नाटकांचे प्रयोग
मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत. काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत.
[ad_2]
Source link
