Sunday, September 13, 2026
Homeब्लॉगबोद्धीसत्व अवलोकितेश्वरांचे शिल्प घारापुरी मुंबई येथे सुस्थितीत पाहायला मिळतात

बोद्धीसत्व अवलोकितेश्वरांचे शिल्प घारापुरी मुंबई येथे सुस्थितीत पाहायला मिळतात

फलटणःपुरी (घारापुरी, मुंबई) इथल्या या बोद्धीसत्व अवलोकितेश्वरांचे शिल्प आज येवढ्याच करता सुस्थितीत पाहायला मिळतात कारण की या बेटाचा ताबा मिळवलेल्या पोर्तुगीजांना हे माहीतच नव्हतं की या भिंतीत येवढे सुंदर शिल्प आहेत, कारण या बेटावर वास्तव्यास असलेले तत्कालीन उपासक या बोद्धीसत्वांची पूजा करून पुन्हा ती फळ्यांच्या दरवाज्याने बंद करत असत, जेव्हा पोर्तुगीजांनी या बेटाचा ताबा मिळवला तेव्हा देखील हे शिल्प फळ्यांच्या दरवाज्याने बंद करून ठेवली होती, त्या दरवाज्यावर धुळ मातीचा इतका थर साचला होता की ते भिंतीशी एकजीव झाले होते त्या कारणास्तव पोर्तुगीजांच्या नजरेतून हे शिल्प सुरक्षित राहू शकली आहेत.

समुद्र मार्गाने व्यापार करणारे व्यापारी बोद्धीसत्व अवलोकितेश्वराची मनोभावे पूजा करत असत व संकट समयी तो आपल्या रक्षणार्थ धावून येतो या धारणेतून अपार श्रध्देतुन बोद्धीसत्व अवलोकितेश्वरांची सुंदर शिल्प आपल्याला लेण्यातून पाहायला मिळतात

हे प्रचलन प्रामुख्याने पाचव्या शतकापासून पाहायला मिळतात, त्यामुळेच अष्टभय शिल्प व महादसभय संकटमोचक शिल्पपट मोठ्याप्रमाणात अढळून येतात..!

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments