Friday, August 14, 2026
Homeसाताराफलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुखपदी ; प्रतिभाताई...

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुखपदी ; प्रतिभाताई चेतन शिंदे

फलटणः राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रतिभाताई चेतन शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली .

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज सातारा दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भवन सातारा येथे प्रतिभाताई चेतन शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे, अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष शफिकभाई शेख, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते अशोकशेठ सस्ते, चेतन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments