
फलटण : दि २३ फलटण शहरासह तालुक्यात रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याबाबत फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी मागील चार दिवसापूर्वी सांगितले होते त्यानुसार फलटण शहरात पिरॅमिड चौकात वाढदिवस साजरा करणे सहा युवकांना चांगलेच अंगलट आले आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सुभान आझम जिरायत, वय २२ वर्षे, राहणार – तेली गल्ली, फलटण याचा वाढदिवस असल्याने दिनांक २२ रोजी रात्री ११.०० वाजता पिरॅमिड चौक, फलटण येथे यांचेसह इतर मुले शांतताभंग करताना आढळल्याने या सर्वांवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे फलटण शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये सुभान आझम जिरायत, यश शहाजी चव्हाण, वय २२ वर्ष, रा. बिरदेव नगर, फलटण, ऋषिकेश दीपक थोरात, वय २३ वर्ष, पवार गल्ली, फलटण, उमेर तन्वीर शेख, वय २२ वर्ष, रा. कसबा पेठ, फलटण, ओम तुषार पवार, वय २२ वर्ष, रा. पवार गल्ली, व हर्षवर्धन विश्वकर्मा निकम, वय २२ वर्षे, रा. बुधवार पेठ, फलटण यांचा समावेश आहे








