Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशKuldeep Yadav | कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक, नजर टाका आकडेवारीवर |...

Kuldeep Yadav | कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक, नजर टाका आकडेवारीवर | Navarashtra (नवराष्ट्र)

Kuldeep Yadav  | कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक, नजर टाका आकडेवारीवर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक, नजर टाका आकडेवारीवर

विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचा दबदबा आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव पाकिस्तानी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो.

कुलदीप यादव : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. या सामान्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आजच्या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सामन्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. न्यूयॉर्कमधील खेळपट्टीबद्दल विचार केला तर आतापर्यत या खेळपट्टीवर गोलंदाजांना जीवनदान मिळाले आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघ सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आजच्या सामन्यात भारताचा वरचष्मा असेल कारण भारताच्या संघाचा विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.

पहिल्या सामन्यामध्ये म्हणजेच भारत विरुद्ध आयर्लंड या सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेन्द्र चहलला वगळण्यात आले होते. परंतु आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो. कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये राहिला तर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. (फोटो सौजन्य – BCCI X अकाउंट)




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments