Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election | 'यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार'; मल्लिकार्जुन खर्गेंचा...

Lok Sabha Election | ‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार’; मल्लिकार्जुन खर्गेंचा विश्वास | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार’; मल्लिकार्जुन खर्गेंचा विश्वास

जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी 273 जागांची गरज आहे, त्यापेक्षा जास्त जागा यावेळी मिळतील. आमची आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही ही युती म्हणून एकत्र आलो आहोत आणि आम्ही जिंकू.

नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला असताना आता काँग्रेसने आपण एकट्यालाच बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी ‘काँग्रेस 273 पेक्षा जास्त जागा जिंकेल’, असा विश्वास व्यक्त केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खर्गे यांनी हा दावा केला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही बोलत आहेत ते खोटे आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपेक्षित संख्याबळ गाठले. पण यावेळी त्यांना सत्तेत येणे अवघड आहे. भाजप दक्षिणेत आणि उत्तरेतही पराभूत होणार आहे. मी हे म्हणू शकतो कारण त्यांचे केरळ किंवा तामिळनाडूमध्ये अस्तित्व नाही, ते इकडे तिकडे एक किंवा दोन जागा जिंकू शकतात. आंध्र प्रदेशात त्यांचे अस्तित्व नाही. तेलंगणात आमचा वरचष्मा आहे’.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments