Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral | बोगस मतदानाचा सुळसुळाट! 40 वर्षीय महिलेच्या ओळखपत्रावर आठवीतील मुलगी करतीये...

Viral | बोगस मतदानाचा सुळसुळाट! 40 वर्षीय महिलेच्या ओळखपत्रावर आठवीतील मुलगी करतीये मतदान, व्हिडिओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

Viral | बोगस मतदानाचा सुळसुळाट! 40 वर्षीय महिलेच्या ओळखपत्रावर आठवीतील मुलगी करतीये मतदान, व्हिडिओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बोगस मतदानाचा सुळसुळाट! 40 वर्षीय महिलेच्या ओळखपत्रावर आठवीतील मुलगी करतीये मतदान, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशमधील बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाली असून सदर व्हिडिओ भाजप उत्तर प्रदेशच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेली आहे.

देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. मतदान देखील मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाली असून सदर व्हिडिओ भाजप उत्तर प्रदेशच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी एका महिलेसोबत मतदान केंद्रावर पोहचली. तिला तिची ओळख विचारल्यानंतर तिने आठवीमध्ये शिकत असल्याचे सांगितले. मतदानाची स्लीप आल्यानंतर ती मुलगी मतदान करण्यासाठी आली होती. सदर व्हिडिओ संभळ लोकसभा मतदारसंघातील असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments