Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशBrazil Flood | ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे ५७ हून अधिक जणांचा...

Brazil Flood | ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे ५७ हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो नागरिक बेपत्ता | Navarashtra (नवराष्ट्र)

Brazil Flood  | ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे ५७ हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो नागरिक बेपत्ता | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे ५७ हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो नागरिक बेपत्ता

दक्षिणेकडे असलेल्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यामध्ये पावसाचा सर्वाधिक कहर चालू आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्राझीलमधील रस्ते, घर वाहून गेली आहेत.

सध्या ब्राझीलमध्ये (Brazil) मुसळधार पाऊस पडत आहेत. या सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे आलेल्या पुराने आणि भुसखलनामुळे ब्राझीलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडे असलेल्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यामध्ये पावसाचा सर्वाधिक कहर चालू आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्राझीलमधील रस्ते, घर वाहून गेली आहेत. तिथे आलेल्या पुरामुळे अनेकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.

ब्राझीलमध्ये मागील आठवड्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. ब्राझीलमधील बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. नुकतीच समोर आलेल्या आकडेवारीनुसार २८१ नगरपालिका प्रभावित झाल्या असून यामध्ये ७४ लोक जखमी झाले आहेत. ६७,००० हून अधिक लोक प्रभावित झाल्याने तिथल्या सरकारने आपत्ती स्थिती घोषित केली आहे. तर ४,५०० लोकांसाठी तात्पुरते आश्रयस्थान दिले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments