मौर्य तर काळातील शिल्पकला

0
18
मौर्य तर काळातील शिल्पकला

जग विख्यात सांची स्तूप आपल्याला सर्वांनाचा माहिती आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीत तयार करण्यात आलेला हा अप्रतिम असा स्तूप.
सांची स्तूपा पेक्षा अप्रतिम असे आणखी दोन स्तूप होते. एक होता #अमरावतीस्तूप आणि दुसरा होता #भरहुतस्तूप आजमितीस आपल्याला फक्त सांची स्तूप पहावयास मिळतो. तर बाकीच्या दोन स्तूपांचे अवशेष वस्तू संग्रहालयात प्रदर्शनात पहायला मिळतात.

मौर्यांच्या पडावा नंतर शुंग काळात या सांची स्तूपाची डागडुजी करण्यात आली होती अशा नोंदी आपल्याला सापडतात. स्तूपाच्या सभोवताली जो दगडी संरक्षक कुंपण पाहतो तो पूर्वी लाकडी होता.लाकडी संरक्षण कुंपणची उन वारा पावसाने झीज झाल्या कारणाने बदलून त्या जागी दगडी कुंपण हे शुंग काळात करण्यात आले.

विशेष म्हणजे चार दिशांना जे चार तोरण दरवाजे आहेत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सातवाहन राज घराण्याच्या दानातून तयार करण्यात आले आहे व त्यावर जी कलाकुसर केली गेली आहे ती स्थानिक कलाकारांनी केली आहे.
हे स्थानिक कलाकार हस्तिदंतावर कलाकुसर करणारे कलाकार होते.
हस्तिदंतावर केलेल्या कलाकृतीला जगात खूप मोठी मागणी होती व आपला देशातून तसा व्यापार देखील मोठ्या प्रमाणावर चालत होता.
हस्तिदंतावर काम करणारे कलाकार हे स्थानिक असल्या कारणाने या तोरण दरवाज्यावरची कलाकृती सगळ्यात अनोखी ठरते व ही कलाकृती अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करते….!

सूरज रतन जगताप
     लेणी अभ्यासक