Mamta Banerjee Accident | ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
57
Mamta Banerjee Accident | ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला | Navarashtra (नवराष्ट्र)


ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा एकदा अपघात झालेला आहे. निवडणूक प्रचारासाठी दौरा करताना त्यांना किरकोळ जखम झाली आहे.

कोलकत्ता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा एकदा अपघात झालेला आहे. निवडणूक प्रचारासाठी दौरा करताना त्यांना किरकोळ जखम झाली आहे. ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुर्गापूरमध्ये आल्या होत्या. तेथून त्या इतर ठिकाणी एका सभेसाठी हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. ममता बॅनर्जी या हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पायऱ्या चढत असताना त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. यावेळी त्या समोरच्या बाजूला पडल्या. यामध्ये त्यांना किरकोळ जखम झाली आहे.

एनएनआय वृत्तसंस्थेचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ममता या हेलिकॉप्टरच्या दिशेने जातात. हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी त्या पायऱ्या चढतात. दरम्यान, अचानक त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या हेलिकॉप्टरमधील समोरच्या सीटवर पडतात. त्याठिकाणी उपस्थित सुरक्षा कर्मचारी त्यांना सांभाळतात. यात ममतांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजत आहे.





Source link