Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाIPL 2024 : DC vs MI : दिल्‍ली सुसाट, बाराव्‍या षटकात ओलांडला...

IPL 2024 : DC vs MI : दिल्‍ली सुसाट, बाराव्‍या षटकात ओलांडला १५० धावांचा टप्‍पा

IPL 2024 : DC vs MI : दिल्‍ली सुसाट, बाराव्‍या षटकात ओलांडला १५० धावांचा टप्‍पा

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) स्‍पर्धेत आज 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्‍या जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली.

शाई होप आणि पंतने धाव फलक हालता ठेवला. बाराव्‍या षटकात दिल्‍लीने १५० धावांचा टप्‍पा ओलांडला आहे.

दहाव्‍या षटकामध्‍ये १२७ धावांवर नबीने पोरेलला बाद केले. त्‍याने २७ चेंडूत ३६ धावांची खेळॅ केली. यामध्‍ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 10 षटकांनंतर संघाची धावसंख्या 128/2 आहे. सध्‍या क्रीझवर कर्णधार ऋषभ पंत आणि शाई होप आहेत.

फ्रेझर मॅकगर्कची २७ चेंडूत ८४ वादळी खेळी

पियुष चावला डावातील आठवे षटकात चावलाच्‍या गुगलीवर फ्रेझरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण टाईमिंग चुकले मोहम्मद नबीने सोपा झेल घेतला. जॅक फ्रेजर मॅकगर्कने 27 चेंडूंत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. त्‍याने अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत दिल्‍लीच्‍या संघाला दमदार सुरुवात करुन दिली.

 दिल्लीची धडाकेबाज सुरुवात, पाॅवर प्‍लेमध्‍ये विनाबाद ९२ धावा

पॉवरप्लेमध्ये दिल्लीने चांगली सुरुवात केली आहे. सलामीला आलेला जॅक फ्रेजर मॅकगर्क वेगळ्याच वेगात फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने 24 चेंडूत 78 धावांची वैयक्तिक धावसंख्या केली . त्याचवेळी, पोरेल 11 धावा करून नाबाद खेळत आहे. सहा षटकांनंतर संघाची धावसंख्या 92/0 आहे.

 

 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments