Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रआपली माती..आपली माणस.. आपला सांगोला..

आपली माती..आपली माणस.. आपला सांगोला..

अकलूज :मौजे. अजनाळे तालुका.सांगोला येथे आज आमदार शहाजी बापू यांचे विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

ज्या खासदारांनी सांगितल होत की पुढची निवडणूक पाणी प्रश्नांवर लढणार नाही आणि तो शब्द खरा करून दाखवला आणि पाणी आल, तसेच ज्याप्रमाणे माण खटाव मतदारसंघाचं नंदनवन झालय अगदी त्याच प्रमाणे सांगोला मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास दीपक आबा साळुंखे यांनी उपस्थित मतदारांना दिला.

तसेच येणाऱ्या निवडणुकीत कमळ या चिन्ह समोरील बटन दाबून आम्ही १ लाखाच मताधिक्य देऊ असे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

या मेळाव्यास आ. शहाजी बापू पाटील,आ.दीपक आबा साळुंखे पाटील, भाऊसाहेब रुपनर, नागणे ताई, चेतन सिंह केदार, अतुल मालक पवार, उत्तम दादा खांडेकर, दुर्योधन हिप्परकर, दादासाहेब लवटे, नवनाथ भाऊ पवार, सुभाष भाऊ इंगवले, महादेव जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments