Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशRam Navni In Ayodhya | रामनगरी अयोध्या सजली, आज रामलल्लाचा होणार विशेष...

Ram Navni In Ayodhya | रामनगरी अयोध्या सजली, आज रामलल्लाचा होणार विशेष सूर्याभिषेक! | Navarashtra (नवराष्ट्र)

Ram Navni In Ayodhya | रामनगरी अयोध्या सजली, आज रामलल्लाचा होणार विशेष सूर्याभिषेक! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रामनगरी अयोध्या सजली, आज रामलल्लाचा होणार विशेष सूर्याभिषेक!

आज दुपारी 12 रामल्लाचा सूर्याभिषेक होणार आहे. यासाठी रुरकी आयआयटीच्या मदतीने खास प्रणाली तयार करण्यात आली आहे.

आज देशभरात रामनवमी (Ram Navni 2024) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी राम मंदिरात पुजा अर्चना करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येत आहे. रामनवमीसाठी रामनगरी अयोध्याही सजली आहे. रामलल्लाची आज विषेश पूजा करण्यात येणार आहे. आजची रामनवमी अनेक अर्थांनी खास असणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकनंतरचे हे पहिले नवरात्र आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामनवमीची विशेष तयारी केली आहे. रामनवमीला रामजन्मोत्सवानिमित्त रामललाचा सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. रामल्लाचा सूर्याभिषेक आज दुपारी ठीक 12 वाजता होणार आहे. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दुपारी बारा वाजता होणार सुर्यअभिषेक

आज दुपारी 12 रामल्लाचा सूर्याभिषेक होणार आहे. यासाठी रुरकी आयआयटीच्या मदतीने खास प्रणाली तयार करण्यात आली आहे. यासाठी रुरकी आयआयटीच्या शास्त्रज्ञांच्या चमूने गर्भगृहात अनेक आरसे आणि लेन्स लावले आहेत. या प्रणालीद्वारे दुपारी ठीक 12 वाजता मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर (तिसऱ्या मजल्यावर) लावलेल्या आरशावर सूर्यकिरण पडतील. हे किरण आरशातून ९० अंशांवर परावर्तित होतील आणि पितळी पाईपमध्ये प्रवेश करतील. पाईपच्या शेवटी आणखी एक मिरर निश्चित केला आहे. या आरशातून सूर्यकिरण पुन्हा परावर्तित होऊन पितळी पाईपच्या साहाय्याने गर्भगृहातील आरसे आणि लेन्सद्वारे रामलल्लाच्या डोक्यावर पडतील. त्यानंतर  सुर्य किरणांनी रामललाचा चेहरा चार मिनिटे सतत उजळला जाईल.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments