Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनमिलिंद गवळी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत भावूक, केली सोशल...

मिलिंद गवळी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

मिलिंद गवळी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

[ad_1]

काय आहे मिलिंद गवळीची पोस्ट?

“लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर. मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर “मराठा बटालियन” मध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली, या सिनेमांमध्ये मला अमर भोसले च्या भूमिकेसाठी घेण्यात आलं, हा व्हिडीओ जो मी अपलोड केला आहे तो माझा या चित्रपटातला पहिलाच सीन होता. मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्याच्यावर ओरडायचे होते. पहिलाच दिवस पहिला सीन. नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग होते. दडपण आले होते. कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी ‘आपण रिहर्सल करूया’ असे मला सांगून कम्फर्टेबल केले. हा सीन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. अख्या शुटिंग भर हसत खेळत मजा मस्ती करत हा “मराठा बटालियन” त्यांनी पूर्ण केला. विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासूनची घट्ट मैत्री होतीच त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे, सतत हस्त खेळत वातावरण ठेवायचे” असे मिलिंदने पोस्टमध्ये म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments