Friday, October 2, 2026
Homeसातारामाढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ घरोघरी :...

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ घरोघरी : समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण : फलटण येथील फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून त्यांच्या प्रचाराला फलटण शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे .

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, शंकर मार्केट, कसबा पेठ, दगडी पूल या परीसरात मतदारांच्या घरोघरी जाऊन माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील पाच वर्षात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. निरा- देवघर, धोम-बलकवडी जोड कालवा प्रकल्प येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करून ते पाणी खंडाळा तालुक्यापासून आदर्की ताथवडा, गिरवी अगदी फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कालव्यामधून हा कालवा बारमाही करण्यासाठी काम सुरू असल्याचे यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण – लोणंद प्रत्यक्षात रेल्वे सुरू केली असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला फलटण बारामती रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात काम सुरू केले आहे.

फलटणकरांसाठी आरटीओ ऑफिस सुरू केले असून जिल्हा सत्र न्यायालय फलटण येथे सुरू झाले आहे. तर फलटण – सातारा, फलटण- पुसेगाव, फलटण- सीतामाई घाट, कुळकजाई रस्ता, फलटण- दहिवडी रोड, फलटण -आसू रोड असे फलटण तालुक्यातील रस्त्याची कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू असल्याचे शेवटी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments