
सागरचा मृत्यू उंदीर चावल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच जोपर्यंत संबंधितांवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाईकांनी ससून रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र रुग्णालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. सागरचा मृत्यू झाल्यावर नातेवाईकांनी त्याला उंदीर चावल्याचा आरोप केला होता. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झाल्याच्या आरोपाला नकार दिला होता. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच कबूल केलं. त्यानंतर नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.



