
काय म्हणाले राहुल गांधी?
‘घाबरलेला हुकूमशहा मृत लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियासह सर्व संस्था ताब्यात घेणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून पैसे उकळणं, प्रमुख विरोधी पक्षाची खाती ‘गोठवणं’ हे सगळं करूनही या असुरी शक्तीची भूक भागलेली नाही. त्यामुळं आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जात आहे. त्यांच्यासाठी हा सगळा खेळ झाला आहे. ‘इंडिया’ आघाडी याला चोख प्रत्युत्तर देईल,’ असं राहुल यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलं आहे.







