प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे

0
15
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे

लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडातील जागा वाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही . महाविकास आघाडीतील नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा देखील झाल्या . मात्र त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नाही . जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे . सध्या त्यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे .प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय लिहिले आहे? . प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलंय की आगामी लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतात महाविकास आघाडीने आपापसात जागावाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही . मी आघाडीबाबत सकारात्मक आहे परंतु जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे . महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना यांच्यात किमान १० जागा आणि काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीत ५ जागांवर समन्वयाचा अभाव आहे . त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी वेळ लागतो , असे त्यांनी त्यातून स्पष्ट केले . . निवडणूकीसाठी कमी कालावधी काँग्रेस शिवसेना यांच्यातील असमन्वय आणि महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेता मी ९ मार्च रोजी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला . त्यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली . तेव्हा शिवसेना कमीत कमी १८ जागा ज्या भाजपा सोबत एकत्रित असताना त्यांनी जिंकल्या होत्या . त्या मागत असल्याबद्दल त्यांनी चिंत व्यक्त केली . चैन्नीथला यांची चिंता समजून मी वचिंत बहुजन आणि काँग्रेसने एकत्रित बसून ज्या जागा काँग्रेसच्या मनात आणि महाविकास आघाडीत मागणी केल्या त्या सर्व जागावर चर्चा करावी . असा प्रस्ताव दिला . तेव्हा बाळासाहेब थोरात माझ्याशी संपर्क साधून प्रस्तावावर पुढे चर्चा करतील असे आश्वासन मला देण्यात आले बाळासाहेब थोरात लवकरच चर्चेसाठी तारीख व आणि वेळ ठरवतील . जेणेकरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून भाजपा आर एस एस ला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जाता येईल असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रात लिहिले आहे