Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशAccident News | महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! तब्बल १४ मुलांना वीजेचा...

Accident News | महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! तब्बल १४ मुलांना वीजेचा धक्का | Navarashtra (नवराष्ट्र)

Accident News | महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! तब्बल १४ मुलांना वीजेचा धक्का | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! तब्बल १४ मुलांना वीजेचा धक्का

राजस्थानमधील कोटा येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. 

राजस्थान – आज देशभरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरण आहे. राजस्थानमध्ये देखील महाशिवरात्रीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यावेळी मोठा अपघात झाला आहे. राजस्थानमधील कोटा येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. कुन्हाडी थर्मल चौकाजवळून जाणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट पसरून 12 पेक्षा अधिक मुलांना विजेचा शॉक  बसला. विजेचा धक्का लागल्यामुळे १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक मुलांच्या हात-पायाला इजा झाली असून सर्वांवर तात्काळ उपचार करण्यात आले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments