Friday, August 14, 2026
Homeसाताराशरद पवारांची महादेव जानकरांना साद, पण माढाच्या लढतीत आणखी एक सिंह उतरल्याने...

शरद पवारांची महादेव जानकरांना साद, पण माढाच्या लढतीत आणखी एक सिंह उतरल्याने चुरस वाढली!

शरद पवारांची महादेव जानकरांना साद, पण माढाच्या लढतीत आणखी एक सिंह उतरल्याने चुरस वाढली!

[ad_1]

सातारा : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये छोट्या घटक पक्षांची घुसमट होत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजप विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महादेव जानकर यांना थेट साद घालत त्यांच्या कोट्यातील माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 

जानकर कोणता निर्णय घेणार?

त्यामुळे महादेव जानकर कोणता निर्णय घेणार? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, महादेव जानकर यांनी शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर स्वागत केलं होतं. मात्र, त्यांनी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आम्हाला कोणती जागा सोडणार? अशी विचारणा केली होती. 

अभयसिंह जगतात राष्ट्रवादीकडून इच्छूक

दरम्यान महादेव जानकरांसाठी शरद पवार आग्रही असतानाच शरद पवार गटातून अभयसिंह जगताप हे सुद्धा माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी महादेव जानकर यांना घातलेली साद माहीत असली, तरी जानकर महाविकास आघाडीकडून उभारण्यास इच्छुक नसतील, तर माझ्या उमेदवारीचा विचार व्हावा असे मी शरद पवारांना सांगितल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मी फिरलो असून याची माहिती शरद पवारांना दिली. पदाधिकारी सोबत असून आम्ही चर्चा केली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय शरद पवार घेतील असं त्यांनी म्हटले आहे. 

कोण आहेत अभयसिंह जगताप? 

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे सुतवाच केले होते. जगताप सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवडचे आहेत. ते पेशाने व्यावसायिक असून गेल्या गेल्या काही वर्षांपासून ते शरद पवार गटांमध्ये सक्रिय आहेत. जयंत पाटील यांनी त्यांच्या कामाचा अनेकवेळा कौतुक केलं आहे. 

शरद पवारांचा माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा जिंकण्यासाठी शरद पवार गटाकडून मोठी तयारी सुरु आहे. सध्या  या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे रणजितसिंह निंबाळकर करतात. मात्र, निंबाळकरांविरोधात पक्षांतर्गत नाराजीचा विरोध वाढत चालल्याची चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही माढाची जागा शरद पवार गटाकडून लढली जाणार की महादेव जानकर शरद पवारांच्या विनंतीला मान देत रिंगणात उतरणार याची चर्चा आहे. दरम्यान, सातार लोकसभेला महायुतीकडून उदयनराजे भोसले रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपच्या संभाव्य यादीत उदयनराजे भोसले आहेत. उदयनराजे भोसले सध्या राज्यसभेवर आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हेच रिंगणात असण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments