Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगबामियान इथल्या स्थानक सम्यक संबुध्दांच्या शिल्पाचे प्रेरणास्थान कान्हेरी लेणी….!

बामियान इथल्या स्थानक सम्यक संबुध्दांच्या शिल्पाचे प्रेरणास्थान कान्हेरी लेणी….!

बामियान इथल्या स्थानक सम्यक संबुध्दांच्या शिल्पाचे प्रेरणास्थान कान्हेरी लेणी….!

इ स च्या पाचव्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या बामियान मूर्तीचे प्रेरणास्थान कान्हेरी लेणी समूहातील लेणी क्रमांक ३ आहे जे की एक चैत्यगृह आहे, या चैत्यगृहाच्या ओसरीच्या दोन्ही भिंतीवर भव्या स्थानक सम्यक संबुध्दांच्या मूर्त्या आहेत.
डाव्या उजव्या बाजूला आकाश मार्गे सपत्नीक येणारे विद्याधर उत्कीर्ण करण्यात आले आहेत तसेच स्तूपाला वंदन करणारे यक्ष त्या खाली सुशोभीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले मकर तोरण या बरोबरच सम्यक संबुध्द स्थितप्रज्ञ असून तल्लम चिवरावर पडलेल्या घडया प्रस्तराला देखील कपड्याचा आभास निर्माण करतात, कधी काळी ही सर्व शिल्प रंगवलेली होती.
इ स पाचव्या शतकात व्यापारउद्योगासाठी आलेले बामियान प्रदेशातील व्यापाऱ्यांनी कान्हेरी लेणीला भेट दिली होती आणि कान्हेरी लेणीत असलेल्या सम्यक संबुध्दांच्या मूर्तीची प्रेरणा घेऊन बामियान डोंगरात भव्य मूर्ती निर्माण केली होती.
बामियान भूभागातील खडक वाळू मिश्रित असल्याने तिथल्या स्थापत्य विशारदांनी प्रस्तरात ढोबळ आकार तयार करून त्यावर (mud plastering ) माती चिखलाचा थर देऊन ठळक आकार तयार करून चिवराच्या कपड्यांवर पडलेल्या घड्यांचा आभास निर्माण करण्यासाठी मोठ मोठ्या दोरखंडाचा वापर केला होता व त्यानंतर त्यावर नैसर्गिक रंगांचे काम केले होते.
बामियान प्रदेशात तुम्ही प्रवेश केला आहे हे या मूर्ती मूळे परदेशी व्यापाऱ्यांच्या लक्षात येई , हा संपूर्ण प्रदेश धम्म अनुसरणारा होता आणि त्यामुळे इथे समृद्धी आणि शांतता नांदत होती आज इथली परिस्थिती उलट आहे.
आख्यायिकेनुसार बामियान डोंगरात असलेल्या सम्यक संबुध्दांच्या मूर्तीला सोनाचा मुलामा देण्यात आलेला होता तसेच मूर्तीवर हिरे जडवण्यात आले होते नंतरच्या इथल्या प्रदेशातील लुटारूंनी या मूर्तीला इजा पोहचवली असे म्हणण्यात येते.

पण महाराष्ट्रातील मुंबईतील बोरीवलीतील कान्हेरी लेणी ही बामियान डोंगरातील सम्यक संबुध्दांच्या मूर्तीचे मूळ प्रेरणास्थान आहे…..!

सूरज रतन जगताप

‘ लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments