Sunday, August 30, 2026
Homeसातारा' मराठी गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन ' मोठया उत्साहात साजरी...

‘ मराठी गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन ‘ मोठया उत्साहात साजरी केला ; श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज

फलटण : जाधवाडी येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे आ ज ‘मराठी गौरव दिन ‘ राष्ट्रीय विज्ञान दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला .

या कार्यक्रमासाठी मुधोजी महाविद्यालय फलटणचे मराठी विभाग प्रमुख डॉ प्रभाकर पवार प्रा सुधीर इंगळे (पर्यावरण प्रेमी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तसेच डॉ सागर निंबाळकर (प्राचार्य श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ फलटण , फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि स्कूल कमिटी सदस्य , संध्या फाळके (प्राचार्य) श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज जाधववाडी फलटण आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा रणवरे मॅडम यांनी केले आणि कवी कुसुमाग्रज व सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय खराडे मॅडम व कुंभार मॅडम यांनी करून दिला. यानंतर प्रा. संध्या फाळके यांच्या हस्ते पाहुण्यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी इयत्ता सहावीमधील सिद्धी इत्राज आणि सिद्धी निकम या विद्यार्थिनींनी ‘मराठी भाषा दिन’ या विषयी भाषण सादर केले आणि इयत्ता पाचवीमधील जोया काझी आणि इयत्ता सहावीमधील अनुष्का निंबाळकर या विद्यार्थिनींनी ‘विज्ञान दिन’ या विषयी आपले भाषण सादर केले. तसेच इयत्ता सातवीमधील समर्था कांबळे, समृद्धी कुंभार, जान्हवी चोरमले, तनुष्का जगताप या विद्यार्थिनींनी मराठी दिनानिमित्त समूहगीत सादर केले. यानंतर मराठी भाषा समृद्ध कशी करावी व तिचे संवर्धन कसे केले पाहिजे, याविषयी डॉ. प्रभाकर पवार सर यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.

अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी मा. प्रा. सुधीर इंगळे सर यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवून बुवाबाजी करणाऱ्या लोकांपुढे कुणीही बळी पडू नये असा संदेश दिला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कोकरे आणि शिवांजली भगत या विद्यार्थिनींनी केले आणि कार्यक्रमांचे आभार अविनाश पवार सर यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments