Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशFarmers March | राजधानी दिल्लीत आज धडकणार शेतकरी संघटनांचा मोर्चा; भारतीय किसान...

Farmers March | राजधानी दिल्लीत आज धडकणार शेतकरी संघटनांचा मोर्चा; भारतीय किसान युनियनची बैठक | Navarashtra (नवराष्ट्र)

Farmers March | राजधानी दिल्लीत आज धडकणार शेतकरी संघटनांचा मोर्चा; भारतीय किसान युनियनची बैठक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

भारतीय किसान युनियन आणि युनायटेड किसान मोर्चाच्या आवाहनावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोमवारी (दि.26) दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. शेतकरी यमुना एक्स्प्रेसवे मार्गे दिल्लीकडे ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. हा ट्रॅक्टर मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय किसान युनियनची बैठक घेण्यात आली.

गाझियाबाद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलक पंजाब-हरियाणाच्या सीमेवर उभे आहेत. त्यात 26 फेब्रुवारी हा दिवस ‘WTO क्विट डे’ म्हणून मानला जाईल, असे सांगण्यात येत आहे. भारतीय किसान युनियन आणि युनायटेड किसान मोर्चाच्या आवाहनावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोमवारी (दि.26) दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. शेतकरी यमुना एक्स्प्रेसवे मार्गे दिल्लीकडे ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. हा ट्रॅक्टर मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय किसान युनियनची बैठक घेण्यात आली.

पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष पवन खटाना यांनी शांततेत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या घोषणेनंतर पोलिस प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ट्रॅक्टर मोर्चाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आले. रविवारपासून दिल्ली आणि नोएडाच्या सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments