Farmers March | शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर; आज ‘रेल रोको’ तर ‘भारत बंद’चेही आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Farmers March | शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर; आज ‘रेल रोको’ तर ‘भारत बंद’चेही आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)


शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर; आज ‘रेल रोको’ तर ‘भारत बंद’चेही आवाहन

शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, एमएसपीवर कायद्याची हमी देण्याची मागणी करत त्यांनी दिल्लीकडे कूचही केले आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनने गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, एमएसपीवर कायद्याची हमी देण्याची मागणी करत त्यांनी दिल्लीकडे कूचही केले आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनने गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जविरोधात संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जोगेंद्रसिंह उगाहा यांनी राज्यात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅक रोखण्याची घोषणा केली आहे. तथापि, भारतीय किसान युनियन शेतकऱ्यांच्या दिल्ली कूच आंदोलनात सहभागी मात्र नाही. कडेकोट पोलिस बंदोबस्त शेतकरी आंदोलनासंदर्भात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना कठोर धोरण अंगिकारले आहे. यावेळी प्रशासनाने शेतकऱ्यांना हरयाणा, दिल्लीतील कोणत्याही मार्गावर आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही.






Source link