
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने माऊलींना ग्लुकोज बिस्किटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
फलटण | प्रतिनिधी :- आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत माऊलींना ग्लुकोज बिस्किटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अत्यंत उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. पायी प्रवासामुळे थकलेल्या वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि ग्लुकोज बिस्किटांचे वाटप करून त्यांना दिलासा देण्यात आला.
या सेवा उपक्रमाला वारकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “माऊलींची सेवा करण्याचे भाग्य लाभले, हीच आमच्यासाठी मोठी पुण्याई आहे,” अशी भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्याबरोबरच मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित नागरिकांनीही कौतुकास्पद असल्याचे सांगितले. वारकरी परंपरेतील सेवा, समता आणि बंधुभावाची जपणूक करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेने राबविलेला हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.









