Political News | ‘भारत जोडो न्याय यात्रे’नंतर काँग्रेसला मोठा झटका; दीडशेपेक्षा जास्त नेते भाजपात दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Political News | ‘भारत जोडो न्याय यात्रे’नंतर काँग्रेसला मोठा झटका; दीडशेपेक्षा जास्त नेते भाजपात दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)


‘भारत जोडो न्याय यात्रे’नंतर काँग्रेसला मोठा झटका; दीडशेपेक्षा जास्त नेते भाजपात दाखल

आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर गुवाहाटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टुडेंट्स युनियनच्या (एएएसयू) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दिसपूर : आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर गुवाहाटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टुडेंट्स युनियनच्या (एएएसयू) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री बिस्मिता गोगोई, माजी विधानसभा अध्यक्ष जीबा कांता गोगोई यांची मुलगी, आसाम प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष अंजन दत्ता यांची मुलगी अंगकिता दत्ता आणि एएएसयूचे माजी अध्यक्ष दीपांका कुमार नाथ यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.






Source link