Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशIran and Pakistan Relation | इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला; 9 पाकिस्तानी...

Iran and Pakistan Relation | इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला; 9 पाकिस्तानी नागरिकांची इराणमध्ये हत्या | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला; 9 पाकिस्तानी नागरिकांची इराणमध्ये हत्या

आग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानच्या नऊ जणांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा इराण आणि पाकिस्तानमध्ये एकदा तणाव वाढल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अज्ञात सशस्त्र लोकांनी सिस्तान-बलुचेस्तान प्रांतातील सरवान शहरातील सिरकान परिसरात एका घरात नऊ विदेशी नागरिकांची हत्या केली.

तेहरान : आग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानच्या नऊ जणांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा इराण आणि पाकिस्तानमध्ये एकदा तणाव वाढल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अज्ञात सशस्त्र लोकांनी सिस्तान-बलुचेस्तान प्रांतातील सरवान शहरातील सिरकान परिसरात एका घरात नऊ विदेशी नागरिकांची हत्या केली. याप्रकरणात कोणत्याही संघटनेने या हत्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

तेहरानमधील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद मुदस्सीर टिपू यांनी सरवानमध्ये 9 पाकिस्तानींच्या भीषण हत्येमुळं मला खूप धक्का बसल्याचे सांगतानाच दुतावास शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण मदत करणार असल्याचे तसेच इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी हा हल्लाचा ‘भयानक आणि घृणास्पद’ म्हणून निषेध केला. तसेच इराण अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करुन या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन केले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments