Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा; देश-विदेशातील नेत्यांकडूनही मोदींचे कौतुक | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा; देश-विदेशातील नेत्यांकडूनही मोदींचे कौतुक | Navarashtra (नवराष्ट्र)


प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा; देश-विदेशातील नेत्यांकडूनही मोदींचे कौतुक

देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देश-विदेशातील राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी कर्तव्यपथावर दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देश-विदेशातील राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी कर्तव्यपथावर दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच युक्रेनचे पंतप्रधान डेनिस शमीहाल यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वशांतीसाठी काम करत आहेत, असे कौतुकोद्गार शमीहाल यांनी काढले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डेनिस शमीहाल म्हणाले की, भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याबद्दल आम्ही कौतुक करू इच्छितो. लोकशाही आणि विविधतेतील एकता या मूल्यांची केलेली जपणूक हीच खरी भारताची व्याख्या आहे. भारत हा सर्वांत मोठा लोकशाही असलेला देश आहे. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये त्याचा समावेश होतो, असे शमीहाल यांनी नमूद केले.






Source link