Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशRepublic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर परेड; 100 महिला कलाकारांनी वाजवली...

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर परेड; 100 महिला कलाकारांनी वाजवली भारतीय वाद्ये | Navarashtra (नवराष्ट्र)

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर परेड; 100 महिला कलाकारांनी वाजवली भारतीय वाद्ये | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर परेड; 100 महिला कलाकारांनी वाजवली भारतीय वाद्ये

देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देश-विदेशातील राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी कर्तव्यपथावर दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देश-विदेशातील राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी कर्तव्यपथावर दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. सध्या संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर परेड घेण्यात आली. यंदा प्रथमच या परेडची सुरुवात 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्ये वाजवून झाली. यामध्ये शंख, नादस्वरम, नगाडा आणि महाराष्ट्राचा ढोल-ताशा वाजवून एका संगितीक पद्धतीनं या परेडची सुरुवात झाली. दरवर्षी 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील (आधीचे राजपथ) कर्तव्यपथावर परेड आयोजित केली जाते. मात्र, 1950 ते 1954 या काळात राजपथवर ही परेड आयोजित करण्यात आली नव्हती. या वर्षांमध्ये, 26 जानेवारीची परेड अनुक्रमे इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला आणि रामलीला मैदानावर झाली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments