Rahul Gandhi | ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असतानाच सोनिया गांधींचा राहुल गांधींना निरोप; दिल्लीकडे लगेच रवाना | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Rahul Gandhi | ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असतानाच सोनिया गांधींचा राहुल गांधींना निरोप; दिल्लीकडे लगेच रवाना | Navarashtra (नवराष्ट्र)


‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असतानाच सोनिया गांधींचा राहुल गांधींना निरोप; दिल्लीकडे लगेच रवाना

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सोडून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. सोनिया गांधी यांनी याबाबत ‘राजकीय’ निरोप दिल्यानेच ते तत्काळ दिल्लीला गेले असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सोडून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. सोनिया गांधी यांनी याबाबत ‘राजकीय’ निरोप दिल्यानेच ते तत्काळ दिल्लीला गेले असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. इन्फाळ येथून सुरू झालेली ही यात्रा गुरुवारी पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात दाखल झाली.

बंगालमध्ये प्रवेश करताच काही तासांतच सोनिया गांधी यांचा निरोप मिळाला असल्याची माहिती काँग्रेस सूत्राने दिली. राहुल गांधींनी कूचबिहारमध्ये रोड शो केला आणि तथापि, यात्रेच्या प्रवासात दोन दिवसांचा ब्रेक असल्याने ते दिल्लीला रवाना झाले, असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते शुभंकर सरकार यांनी दिली.






Source link