
मिळालेल्या माहितीनुसार, विसटेक्स कंपनीचा सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रम रामोजी फिल्मसिटीमध्ये (Ramoji Film City) आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला कंपनीचे अमेरिका स्थित सीईओ संजय शाह (५६ वर्षे) आणि कंपनीचे अध्यक्ष राजू दतला (५२ वर्षे) यांची खास उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार, संजय शाह व राजू दतला हे दोघे एका झुलत्या लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर उतरणार होते. क्रेनच्या सहाय्यानं हळूहळू हा पिंजरा स्टेजवर उतरवला जात होता. या पिंजऱ्याला सजवण्यात आलं होतं. त्याला रोषणाई करण्यात आली होती. कंपनीच्या कर्तृत्वाला साजेसा हा असा जल्लोष करण्याची योजना होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.








