Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशTur Dal Prices | महागाई काय कमी होईना, सर्वसामान्यांना दिलासा मिळेना !...

Tur Dal Prices | महागाई काय कमी होईना, सर्वसामान्यांना दिलासा मिळेना ! तूर डाळीच्या किंमतीत 37 टक्क्यांनी झाली वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

महागाई काय कमी होईना, सर्वसामान्यांना दिलासा मिळेना ! तूर डाळीच्या किंमतीत 37 टक्क्यांनी झाली वाढ

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असले तरी अद्याप मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश आलेले नाही. यादरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असले तरी अद्याप मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश आलेले नाही. यादरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 मध्ये डाळ आणि त्यांचे काही इतर उत्पादनांच्या महागाईत 20.73 टक्क्यांची वाढ झाली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये डाळींचा महागाई दर 20.73 टक्के होता. पण त्याच्या एक वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये हा दर 3.15 टक्के होता. याचा स्पष्ट अर्थ असा की, केवळ एका वर्षाच्या कालावधीत डाळींच्या किरकोळ महागाई दरात 17.58 टक्के वाढ झाली आहे. डाळींच्या दरवाढीमुळे सामन्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. वाणिज्य मंत्रालयद्वारे 15 जानेवारी 2024 ला डिसेंबर 2023 च्या घाऊक महागाई दराचे आकडे जाहीर करण्यात आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments