Monday, September 28, 2026
Homeदेश-विदेशMathura News | आईचा मृतदेह 9 तास श्मशानभुमीत ठेवला, मुली संपत्तीसाठी लढत...

Mathura News | आईचा मृतदेह 9 तास श्मशानभुमीत ठेवला, मुली संपत्तीसाठी लढत राहिल्या, स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आईचा मृतदेह 9 तास श्मशानभुमीत ठेवला, मुली संपत्तीसाठी लढत राहिल्या, स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा!

मथुरेत आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला होता. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवुन प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये (Mathura News) माणुसकीला लाजवणारी घटना उघडकीस आली आहे.  आईच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करायचे सोडून मुली संपत्तीच्या वाटणीसाठी भांडत  होत्या. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवुन मुली संपत्तीसाठी भांडत होत्या. प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. या सगळ्यात सुमारे 8 ते 9 तास वाया गेले. अखेर जमीनीचं वाटप झाल्यानंतरचं मुलींनी त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले.

हे सुद्धा वाचा

मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीतून मानवतेला लाजवेल अशी ही घटना समोर आली आहे. 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरून भांडण सुरू झाले आणि अनेक तासांपर्यंत महिलेचे अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले पंडितही मैदानातून परतले. स्मशानभूमीत अनेक तास मुलींचे नाट्य सुरू होते. त्यामुळे अखेरच्या प्रवासाला निघालेले लोक आणि मृतांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली. नंतर शिक्के आणून जमिनीचे लेखी वाटप झाल्यावर अंत्यसंस्कार पूर्ण करता आले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments