
Ecuador Gunmen : इक्वाडोरमध्ये कुख्यात गुंड तुरुंगातून पळून गेल्यावर शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती, या टोळीने अनेक पोलिस अधिकार्यांच्या अपहरणासह शहरात अनेक ठिकाणी हल्ले केले. दरम्यान, एका टीव्ही कार्यालयात थेट प्रक्षेपण सुरू असतांना हातात बंदुका आणि बॉम्ब घेऊन काही गुंड घुसले. लाईव्ह प्रोग्राम सुरू असतांना त्यांनी हातात बंदुका आणि बॉम्ब दाखवत दहशत माजवली. तसेच टीव्ही कार्यालयातील अनेकांना बंदी बनवले. ही घटना मंगळवारी (दि ९) घडली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.







