Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशBTS Band | बीटीएस बँडच्या तरुणांना भेटण्यासाठी अल्पवयीन मुलींनी सोडलं घर; अवघे...

BTS Band | बीटीएस बँडच्या तरुणांना भेटण्यासाठी अल्पवयीन मुलींनी सोडलं घर; अवघे 14 हजारात समुद्रीमार्गे दक्षिण कोरियाला जाण्याची केली योजना, वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बीटीएस बँडच्या तरुणांना भेटण्यासाठी अल्पवयीन मुलींनी सोडलं घर; अवघे 14 हजारात समुद्रीमार्गे दक्षिण कोरियाला जाण्याची केली योजना, वाचा सविस्तर

ग्रामीण भागातील तीन अल्पवयीन मुलीही बीटीएसच्या चाहत्या असून या बँडमधली तरुणांना भेटण्यासाठी त्यांनी अजब धाडस केले. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पोहोचण्यासाठी या मुलींनी 14 हजार रुपये गोळा करुन घरातून पळ काढला.

चेन्नई : दक्षिण कोरियातील (South Korea) बीटीएस (BTS Band) हा म्युझिकल बँड (BTS Band Musical band) सध्या जगभरामध्ये गाजतो आहे. या बॅंडमधील कलाकारांचे जगभरात दिवाने असून खास करुन वर्ग त्यांच्या गाण्याकडे आकर्षित झाला आहे. तमिळनाडूच्या (Tamil Nadu) ग्रामीण भागातील तीन अल्पवयीन मुलीही बीटीएसच्या चाहत्या असून या बँडमधली तरुणांना भेटण्यासाठी त्यांनी अजब धाडस केले. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पोहोचण्यासाठी या मुलींनी 14 हजार रुपये गोळा करुन घरातून पळ काढला. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी त्यांची सुटका केली.

तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय तीन अल्पवयीन मुलींनी बीटीएस म्युझिकल बँडमधील तरुणांना भेटण्यासाठी घर सोडले. या 13 वर्षीय तिन्ही मुली मागील एक महिन्यांपासून याचे दक्षिण कोरियाला जाण्याचे नियोजन करत होत्या. याबद्दल त्यांनी सगळी माहिती इंटरनेटवरुन मिळवत 14 हजार रुपये गोळा केले. आपल्या गावातून चेन्नई आणि मग चेन्नईतून ट्रेनच्या माध्यमातून विशाखापट्टनमला जायचे. तिथून समुद्रामार्गे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला प्रवास करायचा अशी मोहिम अल्पवयीन मुलींनी आखली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments